फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी : तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे यांची मागणी

तळेरे (प्रतिनिधी) : फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून ऑनलाईन सिस्टीम गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळ पीक विमा रक्कमेचा हप्ता भरण्यासाठी असंख्य अडचणी येत आहेत. याबाबद शासन तसेच प्रशासकीय यंत्रणेने गंभीर दखल घेऊन या योजनेचा हप्ता भरण्याचा कालावधी वाढविण्यात यावा अशी आग्रही मागणी तळेरे उपसरपंच शैलेश सुर्वे यांनी केली आहे.

फळ पीक विमा योजनेसाठी आवश्यक सातबारा तसेच आठ अ ही ऑनलाईन मिळणारी कागदपत्रे गेल्या चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने शेतकऱ्यांना मिळणे दुरापास्त झाले आहे.त्या कागदपत्रांशिवाय शेतकऱ्यांना हप्ता भरण्याची इच्छा असूनदेखील विमा हप्ता भरता येत नाही.अशा विचित्र परिस्थितीत शेतकरी वर्ग सापडला आहे.त्यात विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख उद्या ३० नोव्हेंबर असून सर्व्हर डाऊन असल्या कारणाने विमा हप्ता भरणे दुरापास्त झाले आहे.शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.

या गोष्टीची तातडीने गंभीर दखल घेऊन लोक प्रतिनिधी,शासन व प्रशासकीय यंत्रणेने शासनस्तरावरती तातडीने पाठपुरावा करून विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत वाढ वाढवून देण्याची मागणी उपसरपंच शैलेश सुर्वे यांनी केली आहे.

error: Content is protected !!