आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत देवगडमध्ये 60 एसटी कर्मचारी संघटनेत दाखल
देवगड (प्रतिनिधी) : भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या देवगड आगारामध्ये मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश केला असून सुमारे 60 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आज जामसांडे येथील भाजपा कार्यालयात उपस्थित राहून प्रवेश केला. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, हे उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी द्यावेत त्या पण नक्की सोडवू असे सांगून लवकरच कर्मचाऱ्यांचा जिल्हा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नितेश राणे यांनी बोलताना ही संघटना सत्ताधारी पक्षाची आहे केंद्रात व राज्यात आपला पक्ष असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ यांची देवगड आगारातील कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष विकास वसंत कोकम, उपाध्यक्ष पंकज राजम,एन के शेट्ये,सचिव साईनाथ ओटवकर,सहसचिव एन एस सावंत,एस एस साटम, खजिनदार-एस.आर. आचरेकर,संघटक-सचिव एन. एन घाडी, जिल्हा कार्यकारणी सदस्य-व्ही.आर.सावंत, पि.डी.परब,आर एम मेस्त्री,सल्लगार-एस. व्ही पाटील,एम .डी. जाधव,एल.एम लाड,आर जी नारींग्रेकर,प्रसिध्दी प्रमुख प्रथमेश प्रदीप घाडी देवगड आगार मध्ये या संघटनेचा फलक लावण्यात आला असून फलकाच्या अनावरण आ. नितेश राणे यांनी केले.














