कणकवली (प्रतिनिधी): केंद्रीय लघु व सूक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू , बहुजन समाजाचे श्रद्धास्थान श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना अटक करण्याची मागणी केली. त्यावेळी त्यांचे भारतीय संघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू असलेला माजी खासदार एका राजकीय पक्षाचे राष्ट्रीय नेते यांचा उल्लेख एकेरी शब्दात केला या गोष्टीचा निषेध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडी जिल्हा कार्यकारीने सर्व तालुकाध्यक्ष, महिला आघाडी, युवक आघाडी, अध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि सर्व आजी-माजी पदाधिकारी यांच्या वतीने दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा एसटी स्टँड जवळ कणकवली येथे निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर वंचित बहुजन आघाडी कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव यांनी दिली.
केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा वंचित बहुजन आघाडी कणकवलीत करणार निषेध












