सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : शाळकरी मुलीचा मोटरसायकलवरून पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल पोक्सो च्या गुन्ह्यातील लियो सावियो कार्डोज आणि जोजफ ऍलेस फर्नांडिस ( रा . गोवा ) या दोन्ही आरोपींना 25 दिवसांच्या कारावासासह प्रत्येकी 2 हजार दंडाची शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश श्री संजय भारूका यांनी सुनावली. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. दोडामार्ग तालुक्यातील एका हायस्कूल मधील विद्यार्थीनीचा पाठलाग करून या दोन्ही आरोपींची अश्लील शेरेबाजी केली होती.याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार पोक्सो सह विनयभंग व अन्य कलमानुसार गुन्हा दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. ही घटना 28 जानेवारी 2020 रोजी घडली होती.या गुन्ह्याचा तपास एपीआय स्वाती यादव यांनी केला होता. आज या गुन्ह्याचा निकाल देताना विशेष जिल्हा न्यायाधीश श्री. भारुका यांनी दोन्ही आरोपींना रोख दंडासह 25 दिवस कारावासाची शिक्षा सुनावली.दोन्ही आरोपींना 25 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते.ते 25 दिवस शिक्षेत गणण्यात आले.












