स्नेहालय संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहातून गावच्या विकासाला दिशा मिळेल !-संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी

स्नेहालयाच्या बहुउद्देशीय सभागृहाचे भूमिपूजन हा दिवस फोंडाघाट वासियांसाठी अभिमानास्पद ! -सरपंच संजना आग्रे

फोंडाघाट (प्रतिनिधी) : आपल्या गावा साठी आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा आहे. स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी समाजातील दुर्बल- वंचित- विद्यार्थी शिक्षण- दुर्बल महिला यांच्या उत्थापना साठी आयुष्य पणाला लावताना, फोंडाघाट येथील तेजस्विनी कुलकर्णी दांपत्यांनी, मोफत दिलेल्या जागेत संस्थेची बहुउद्देशीय वास्तू उभी राहत आहे. यासाठी फोंडाघाटवासी यांचे वतीने आमची ग्रामपंचायत सदैव सहकार्य करेल. असे उद्गार फोंडाघाट सरपंच संजना आग्रे यांनी काढले.

या वास्तूचा उद्घाटन समारंभ २६ जानेवारी २०२४ रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आ.नितेश राणे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असण्याची घोषणा डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी यावेळी केली.

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या प्रेरणेने स्थानिक स्वराज्य निधीमधून सुमारे २५ लाखाचा आर्थिक सहयोग आणि आम. नितेश राणे यांचे मार्गदर्शनातून हे सांस्कृतिक सभागृह आकाराला येत आहे. यावेळी भूमिपूजन विश्वस्त प्रसाद वालावलकर यांचे हस्ते आणि सभागृहाचा चिरा सरपंच संजना आग्रे यांचे शुभहस्ते ठेवण्यात आला. पौरोहित्य प्रसाद तथा भाई हिर्लेकर यांनी केले. यावेळी या संस्थेचे कोकण विभागाचे पालक श्रीमती प्रीती ठिकाण ठिकाण आणि फोंडा विभागाचे समन्वयक संतोष धर्माधिकारी आणि सहकारी देवमाने यांचे सह उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामविकास अधिकारी विलास कोलते, पोलीस पाटील सुधीर तेली, राजन नांचे, बबन हळदिवे, विश्वनाथ जाधव,राजश्री नांचे, कमलाकर गोसावी, विजय हळदिवे, गणेश हळदिवे आणि सिद्धेश पावसकर तसेच फोंडा ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी स्नेहालय संस्थेचा बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृह फोंडाघाट वासियांचे प्रेरणास्थान बनावे .स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका, रोजगार, शिक्षण, करियर मार्गदर्शन, आजच्या अत्याचारीत-दुर्बल- वंचित महिलांना कायदेशीर सल्ला आणि सहकार्य, यामधून खऱ्या अर्थाने ग्रामस्थांना गावच्या विकासाला दिशा मिळेल. म्हणूनच ना.नारायण राणे आम.नितेश राणे यांचे सहकार्य संस्थेसाठी बहुमोलाचे आहे. याकरिता फोंडाघाट वासियांनी संस्थेला सहकार्य करावे. असे आवाहन संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात केले.

उपसरपंच तन्वी मोदी यांनी सुद्धा स्नेहालयाची ही वास्तू फोंडाघाटच्या सर्वांगीण विकासाला एका उंचीवर नेईल,असा विश्वास व्यक्त केला.त्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने सहकार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील विविध विभागातील प्रतिष्ठित मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला.आभार प्रदर्शन संतोष धर्माधिकारी यांनी केले.

error: Content is protected !!