बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवलीमध्ये लीड अभ्यासक्रम विद्यार्थी परिषदेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था संचलित बाल शिवाजी इंग्लिश मिडीअम स्कूल कणकवली स्कूलमध्ये दिनांक 26 नाेव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत लीड अभ्यासक्रमांतर्गत उपक्रम घेण्यात आले. प्री प्रायमरी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विषयानुसार आपापले उपक्रम सादर केले या उपक्रमाचे परीक्षण करण्यासाठी सौ. पद्मजा नागवेकर (आदर्श विद्यालय कणकवली) नरेंद्र जोशी (इंग्रजी शिक्षक एस. एम. हायस्कूल कणकवली) वैशाली पाटील घोरपडे (कणकवली कॉलेज प्राध्यापिका) यांची उपस्थिती लाभली.

या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या प्रायोगिक कलेला वाव मिळतो.लीड अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शाळा विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत उपक्रम राबवते. या परिषदेचे आयोजन संस्थेच्या संचालिका सुलेखा राणे,संदीप सावंत,मुख्याध्यापिका सौ कुलकर्णी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

error: Content is protected !!