खारेपाटणमधील अवकाळीग्रस्तांना मोफत कौले वाटप

सतीश गुरव यांची सामाजिक बांधिलकी

कणकवली (प्रतिनिधी) : अलीकडेच झालेल्या वादळी अवकाळी पावसात नुकसानग्रस्त झालेल्या खारेपाटणवासीयांना सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी मदतीचा हात देत मोफत कौंले वाटप केले आहे. मागील चार दिवसांत वादळी अवकाळी पावसाने खारेपाटण गावाला अक्षरशः झोडपून काढले आहे. राहत्या घरांसह विजेची उपकरणे, झाडे यांच्यासह शासकीय मालमत्तेचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यातच खारेपाटण गावातील आर्थिक दुर्बल असलेल्या ग्रामस्थांच्या घराच्या छप्पराची कौलेही तुटून पडली. राहत्या घराच्या छप्पराची कौले तुटून पडल्यामुळे नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागला. या संकटसमयी खारेपाटण गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सतीश गुरव यांनी पदरमोड करून तात्काळ मदत म्हणून 500 कौले गावातील नागरिकांना घरपोच केली. या तातडीच्या मदतीमुळे खारेपाटण वासीयांना किमान कौले घालून छप्पर दुरुस्ती करणे शक्य झाले आहे. सतीश गुरव यांनी तातडीने केलेल्या मदतीबद्दल अवकाळी नुकसानग्रस्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!