तिथवलीचे सुपुत्र आणि मुंबईचे नवनिर्वाचित नगरसेवक किरण तावडे यांचा मूळ गावी जंगी सत्कार!

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लालबाग-परळ (वॉर्ड क्र. २०४) येथील नवनिर्वाचित नगरसेवक आणि तिथवलीचे सुपुत्र किरण तावडे यांचा त्यांच्या मूळ गावी नुकताच ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. नगरसेवकपदी शानदार विजय मिळवल्याबद्दल तिथवली ग्रामपंचायत कार्यालयात हा आनंदोत्सव आणि सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी तिथवलीच्या सरपंच प्रियांका हरयाण, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नासिर काझी, प्रसिद्ध उद्योजक विजय तावडे, तंटामुक्ती अध्यक्ष साजिद काझी तसेच मुंबई मंडळाचे सचिव अनिल कडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच माजी पोलीस पाटील गणेश हरयाण, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष हरयाण, सोसायटी चेअरमन ब्रह्मा हरयाण, सोसायटी सचिव दिनकर काडगे, उपसरपंच चंद्रकांत पाष्टे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य रिहाना काझी, सुरेश हरयाण आणि ओमकार हरयाण आदी मान्यवरांनीही उपस्थित राहून किरण तावडे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सत्काराला उत्तर देताना नगरसेवक किरण तावडे यांनी ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले. “मुंबईतील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. त्याचबरोबर माझी जन्मभूमी असलेल्या तिथवली गावाच्या सर्वांगीण विकासासाठीही मी सदैव कटिबद्ध राहीन,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या गावच्या सुपुत्राने मुंबईत मिळवलेल्या या यशाबद्दल अभिमान व्यक्त करत जल्लोष साजरा केला.

error: Content is protected !!