तळेरे- वैभववाडी मार्गावर नाधवडेत रस्त्यावर झाड कोसळले ; वाहतुकीला होतोय अडथळा

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे-वैभववाडी मार्गावर नाधवडे येथे रस्त्यावर अकेशीये चे झाड कोसळल्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. नाधवडे नापणे फाट्यानजीक वैभववाडी च्या दिशेने रस्त्यावर हे झाड आज सायंकाळी कोसळले. भर रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. वाहनचालकांनी स्वतः झा तात्पुरते बाजूला करत आपल्या वाहनांना वाट मोकळी करून दिली असली तर अवजड वाहनांना झाडाचा अडथळा होत आहे. संबंधित यंत्रणेने तात्काळ दखल घेत रस्त्यावर पडलेले झाड बाजूला करून वाहतुकीला होणार अडथळा दूर करण्याची मागणी वाहनचालकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!