वराडकर हायस्कूलच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम;

आचरा खाडीकिनारी केली कांदळवन वृक्षांची लागवड

कांदळवन संवर्धनासाठी नाटिका बसवून करणार जनजागृती

चौके (अमाेल गाेसावी) : कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांना माहिती व्हावी, त्याचे महत्त्व समजावे. जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा. यासाठी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चे शिक्षकांनी आचरा खाडीतील जामडुल वाडीतील युवक ओमप्रकाश आचरेकर यांना सोबत घेऊन कांदळवन ची माहिती जाणून घेतली व तेथे रोपांची लागवड केली

त्याचबरोबर यांचा प्रसार होण्यासाठी एक छोटीशी नाटिका बसवण्याची संकल्पना मुख्याध्यापक संजय नाईक यांनी शिक्षकांच्या समोर मांडली. आणि लागलीच सर्व सहकारी शिक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वरील संकल्पना प्रकाश कानूरकर (सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ,) यांनी जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांना सांगितली. सर्वांनी या कांदळवनाचा प्रसार करावा अशी विनंती केली. याला प्रतिसाद म्हणून सर्व जिल्ह्यांतील शिक्षकांनी कांदळवन सफर करण्याची इच्छा व्यक्त केली.

कांदळवन हे आचरा बंदराजळच्या खाडीत आहे. हे कांदळवन म्हणजे सागराजवळ वाढणारा अनेक वनस्पतींचा समूह. याला मराठीत कच्छ वनस्पती असेही म्हणतात. या कांदळवनामुळे समुद्री अन्नसाखळी टिकून राहते. हे इतके उपयुक्त आहे, कांदळवने समुद्र किनाऱयांचे लाटांपासून, त्सुनामीपासून तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात. अनेक समुद्र प्रजातींचे प्रजनन कांदळवन क्षेत्रात होते., यासाठी ‘पांढरी चिप्पी’ (सोनेरेशिया अल्बा) या वृक्षास राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषीत करण्यात आले आहे.” राज्य कांदळवन वृक्ष” घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.

पांढऱ्या चिपीची फुले सुगंधी असून मधमाशा, कीटक व पक्षांना आकर्षित करतात देशातील कांदळवनांच्या एकूण प्रकारापैकी सुमारे वीस प्रकार आपल्या महाराष्ट्र किनारपट्टीवर दिसून येतात. या वीस प्रजातींपैकी पांढरी चिप्पी ही एक प्रजाती आढळते.
या कांदळवन सफारी लागवडीसाठी मुख्याध्यापक संजय नाईक, प्रकाश कानूरकर, महेश भाट, समीर चांदरकर,संजय पेंडूरकर, भुषण गावडे या शिक्षकांनी लागवड केली. व संपूर्ण माहिती जाणून घेतली.

मुख्याध्यापक शिक्षकांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा चे विश्वस्त सेवानिवृत्त कर्नल शिवानंद वराडकर,ॲड. सोनू पवार,अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष शेखर पेणकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, सचिव सुनील नाईक, सचिव श्रीमती विजयश्री देसाई, शालेय समिती चेअरमन सुधीर वराडकर,सहसचिव एस,डी गावडे,व सर्व संचालक पदाधिकारी, तसेच वराडकर हायस्कूल कट्टा चे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!