टाटा ए.आय.ए. लाईफ इन्शुरन्स ची रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये गरुडभरारी

पदार्पणातच तीन एमडीआरटी करून रचला इतिहास

चौके (प्रतिनिधी) : भारतातील अग्रगण्य इन्शुरन्स कंपनी टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने कामाला सुरुवात करून प्रथम प्रदार्पणातच तीन एमडीआरटी करून इतिहास रचला. या सर्वांचा जाहीर सत्कार सोहळा हॉटेल विवा एक्झिक्यूटिव्ह रत्नागिरी येथे नुकताच संपन्न झाला

एमडीआरटी हे इन्शुरन्स क्षेत्रातील मानाचे पद मानले जाते, याला इन्शुरन्स मधील ऑस्कर अवॉर्ड ने देखील संबोधले जाते. एमडीआरटी ही जागतिक स्तरावरील मेंबरशिप असून जगातील सर्व इन्शुरन्स कंपन्या यासाठी स्पर्धा करीत असतात. टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स ही जागतिक स्तरावर एम डी आर टी क्रिएशन मध्ये नवव्या क्रमांकावर आहे.
एमडीआरटी सोहळ्यात प्रथम क्रमांकाचा मान मिळवला तो रत्नागिरी जिल्ह्यातील कुवारबाव या गावातील निवृत्त शासकीय अधिकारी श्री अनिल परब यांनी. आपल्या मनोगतात इन्शुरन्स क्षेत्रातील संधी होणारे बदल उच्चशिक्षित लोकांनी का सहभागी व्हावे याविषयी अनिल परब आपले विचार मांडले.

द्वितीय क्रमांकाचा मान मिळवला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील फेनी फर्नांडिस यांनी. परदेशात वैद्यकीय क्षेत्रात काम केलेल्या आणि आता गृहिणी असलेल्या त्यांनी आपल्या मनोगतात इन्शुरन्स क्षेत्रात महिलांना करिअर च्या संधी, समाजासाठी इन्शुरन्स का आवश्यक आहे महिलांनी इन्शुरन्स क्षेत्रात सहभाग वाढवावा याविषयी आपले विचार मांडले.
तृतीय क्रमांकाचा मान मिळवला तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील हडी या गाव खेड्यातून आलेल्या आणि व्यवसायाने बिल्डिंग मटेरियल सप्लायर असलेल्या देवानंद आळवे यांनी.आपल्या मनोगतात तरुणांनी इन्शुरन्स क्षेत्रात का यावे, खेड्यात इन्शुरन्सची असणारी गरज तसेच टर्म इन्शुरन्स कुटुंबातील कर्त्या व्यक्तीसाठी किती महत्वाचे आहे, देवानंद आळवे यांनी याविषयी आपले विचार मांडले.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणारे अवधूत चव्हाण यांनी इन्शुरन्स क्षेत्रात टाटाचे योगदान लोकाभिमुख योजना इन्शुरन्स मधील करिअर याविषयी मार्गदर्शन केले. शेवटी रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करणारे मनोज सावंत यांनी समाजसेवेतून अर्थकारण याविषयी आपले विचार मांडून सर्वांचे आभार प्रदर्शन केले.

error: Content is protected !!