ओटवणेतील २२ वर्षीय युवकाची गळफास लावून आत्महत्या

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे कापईवाडी येथील साहिल सदगुरु केळुसकर (२२) या युवकाने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केली. आज सायंकाळी च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. त्याचे वडिल मोलमजूरी करतात. नेहमीप्रमाणे आजही ते मोलमजूरी करण्याकरीता गेले होते. तर आई सावंतवाडी येथे बाजाराला गेली होती. याच वेळी घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने माजघरात गळफास लावून घेतला. साहिल हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे या प्रकारामुळे त्यांच्यावर दुःखाचा पहाडच कोसळला आहे.

error: Content is protected !!