न्याहरी निवास धारकांना मिळणार एक लाख पर्यंत व्यवसाय वाढीसाठी अनुदान- विष्णू (बाबा) मोंडकर

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हात सागरी पर्यटन क्षेत्राबरोबर ऍग्रीकल्चर, हिस्ट्री, मेडिकल टुरिझम क्षेत्रात स्थानिक उद्योजक सहभाग दर्शवित आहेत अश्या व्यावसायिकांना सिंधुरत्न समृद्धी योजना 2023-24 अंतर्गत पर्यटन स्थळाजवळ न्याहरी निवास केंद्राचे सक्षमीकरण करणे ही योजना प्रस्तावित करण्यात आली असून न्याहरी निवास प्रकल्पाच्या खर्चाच्या 75% किंवा 1 लाख कमाल अनुदान प्रत्येक लाभार्थ्याला देण्याचे ठरविण्यात आले असून त्या अनुषंगाने स्वतःच्या नावे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मान्यता प्राप्त न्याहरी व निवास धारकांकडून व्यवसाय सक्षमीकरणासाठी फर्निचर खरेदी, इमारत दुरुस्ती, विस्तारीकरण, रंगरंगोटी करणे इत्यादी बाबीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले असून प्रथम परिपूर्ण 100 प्रस्तावांना मान्यता देण्याचे ठरविण्यात आले आहे यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या कडील तपासणी सूची प्रमाणे दिनांक 29/12/23 पर्यंत न्याहरी निवास धारकांनी प्रस्ताव सादर करावयाचा आहे ही योजना स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना कोरोना काळानंतर संजीवनी देणारी असून सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष तथा शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण तसेच सिंधुरत्न योजना सदस्य प्रमोद जठार यांचे पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे आभार मानण्यात येत आहेतं तसेच या योजनेचा पर्यटन व्यावसायिकांनी लाभ घ्यावा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात 4000 पेक्षा न्याहरी निवास धारक कार्यरत असून अंशतः पर्यटन व्यावसायिकांनी आपले व्यवसाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाशी जोडले असल्याने या योजनेच्या पात्रता होण्यासाठी किंवा अन्य काही अडचण आल्यास पर्यटन व्यावसायिक महासंघास संपर्क साधावा असे आवाहन विष्णू (बाबा) मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!