मसुरे (प्रतिनिधी) : श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सद्गुरु गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास (रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे,वडाचापाट या मठाचा १२ वा वर्धापन दिन सोहळा २४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त आयोजित विविध कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. सकाळी ८ वा.अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका अभिषेक,सकाळी ९ वा.श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजाअर्चा, सकाळी ९.३० वा.पालखी पूजन, स. १० वा.अक्कलकोट पादुका पालखी मिरवणुक सोहळा, सकाळी ११ वा.महाआरती, दुपारी ११.३० वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू.सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन, दुपारी १२.३० वा.श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण,दुपारी १ वा.महाप्रसाद (महाअन्नदान),सायं.५ वा.सुस्वर भजनेसायं.६ वा.दिपोत्सव,रात्रौ ८ वा.दिंडी पथक- श्री गणेश वारकरी भजन मंडळ – त्रिंबक, ता. मालवण. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे,वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ मठ मसदे-वडाचापाट वर्धापन दिन २४ डिसेंबर रोजी!












