मसुरे (प्रतिनिधी) : श्रीरामजन्मभुमी अयोध्या येथुन श्रीराम मंदीर निर्माणपूर्तिचे औचीत्य साधुन अयोध्येवरून आलेल्या पवित्र अक्षता मंगल कलशाचे पूजन अक्कलकोट येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात शेकडो राम भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्ती भावाने वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीत अयोध्या येथून आलेल्या पवित्र अक्षता मंगल कलश हा शहर व तालुक्यातील सर्व मंदिरात एक एक दिवस ठेवण्यात येणार आहे. त्या कालावधीत त्या परिसरातील, गावातील रामभक्तांना पवित्र अक्षता मंगल कलशाचे दर्शन घेता येणार आहे. वटवृक्ष मंदिरातील पवित्र अक्षता मंगल कलश पूजनाला मंदिराचे पुजारी मंदार महाराज, वेंकटेश महाराज,तालुका संघचालक रवी जोशी, तालुका कार्यवाह चेतन जाधव,तालुका सहकार्यवाह सुशील हिरस्कर,तालुका प्रचारक यश कुलकर्णी,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक संजय जमादार,तालुका सहसंयोजक मदन राठोड,विश्व हिंदू परिषदेचे भिमराव शेळके,गुंडूअण्णा येळमेली, मोहन साळुंके,संजय भागानगरे,समर्थ स्वामी,मल्लिनाथ स्वामी,रमेश कापसे,शिरीष पंडित,राघवेंद्र बागेवाडीकर,ऋषी लोणारी,ओंकार पाठक,चंद्रकांत वेदपाठक,अक्षय सरदेशमुख,श्रीशेल गवंडी,सचिन हन्नुरे,तोळणुरे,संतोष वगाले,सायबन्ना सोनकांबळे,संदीप कटकधोंड, आदी उपस्थित होते.
दिनांक १५ जानेवारी पर्यंत या पवित्र अक्षता मंगल कलशाचे शहर व तालुक्यातील मंदिरात राम भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच एक जानेवारी ते १५ जानेवारी दरम्यान श्रीरामाची प्रतिमा व पवित्र अक्षता घरोघरी देण्यात येणार आहेत. दि.२२ जानेवारी रोजी घरोघरी पणत्या लावून,रांगोळी काढून, दिवाळीसारखा उत्सव प्रत्येक घरात साजरा करावयाचा आहे. तसेच आपल्या भागात किंवा गावात आल्यानंतर सदर पवित्र कलशाचे दर्शन घेऊन श्री रामाचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन श्रीराम जन्मभूमी सेवा समिती,अक्कलकोट यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.












