सुरक्षा रक्षक रत्नागिरी सुरक्षा रक्षक महामंडळाकडून घेण्याच्या प्रक्रियेला शिवसेना (उ.बा.ठा) चा विराेध

कुडाळ युवासेना तालुका समन्वय योगेश तावडेंचा आंदाेलनाचा इशारा

कुडाळ (प्रतिनिधी) : एकीकडे शासन निधीची बचत व्हावी यासाठी प्रयत्नशील असता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मात्र शासनाचा जादा निधी खर्च व्हावा यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकल कॉलेज साठी लागणारे सुरक्षा रक्षक रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाकडून न घेता सुरक्षा रक्षक महामंडळाकडून सुरक्षा रक्षक घेण्याची प्रक्रिया अधिष्ठाता यांनी सुरू केली आहे. मात्र असे केल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षा रक्षक आणि स्थानिक तरुणांना अन्याय होणार आहे. तसेच शासनाच्या निधीचाही अपवय होणार आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक महामंडळाकडून सुरक्षा रक्षक घेण्यास उबाठाचे कुडाळ युवासेना तालुका समन्वय व ओरोस ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी कडाडून विरोध केला असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाकडून स्थानिक सुरक्षा रक्षक घ्यावे अशी मागणी करत तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी अधिष्ठाता यांना दिला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग साठी लागणारे सुरक्षा रक्षक रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाकडून घेण्यात आले आहे. असे ३६ सुरक्षा रक्षक सद्या कार्यरत आहेत. तसेच या महाविद्यालयासाठी अजून सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे. मात्र नव्याने लागणारे सुरक्षा रक्षक हे रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळामार्फत न घेता ते सुरक्षा रक्षक महामंडळामार्फत घेण्याची प्रक्रिया वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. सुनिता रामानंद यांनी सुरू केली आहे. त्याशिवाय रत्नागिरी सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षक घेतल्यास शासनाचे १७ लाख रुपये वार्षिक बचत होणार आहे. मात्र हेच सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षक महामंडळामार्फत घेतल्यास जादा १७ लाख रुपये खर्च होणार आहे. तसेच स्थानिक सुरक्षा रक्षक यांच्यावर अन्याय देखील होणार आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षक महामंडळाकडून सुरक्षा रक्षक घेण्यास उबाठाचे कुडाळ युवासेना तालुका समन्वय व ओरोस ग्रामपंचायत सदस्य योगेश तावडे यांनी कडाडून विरोध केला असून या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाकडून स्थानिक सुरक्षा रक्षक घ्यावे अशी मागणी करत तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी अधिष्ठाता यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!