जानवलीत अपघातात मयत अंजली साळविंच्या दुचाकीला ठोकरलेली इनोव्हा कार सापडली

शिरगाव चेकपोस्टवर पोलीस निरीक्षक नीळकंठ बगळे, एएसआय डगरे यांच्या चातुर्याने कारसह चालक पोलिसांच्या ताब्यात

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : जानवली रतांबी व्हाळ येथे अंजली अमित साळवी यांच्या दुचाकीला ठोकून अंजली यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेली पसार झालेली इनोव्हा कार ( MH – 07 Q – 7894 ) शिरगाव चेकपोस्टवर देवगड पोलिसांना सापडली. अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक अवधूत मनोहर धुवाळी ( रा. जामसंडे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानवली येथे 14 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारने अंजली साळवी यांच्या दुचाकीला धडक देऊन पसार झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला घटनेची माहिती देत अज्ञात कारबाबत सूचना केली होती. जानवली येथे अपघात घडल्यानंतर सदर अपघातग्रस्त कारसह चालकाने घटनस्थळावरून धूम ठोकली होती. शिरगाव चेकपोस्टवर सदर इनोव्हा कार आली असती ऑन ड्युटी एएसआय डगरे याना इनोव्हाच्या दर्शनी डावा भाग तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने संशय आला.डगरे यांनी चालकाकडे चौकशी केली असता चालक धुवाळी याने चिरे भरलेल्या ट्रक ने इनोव्हा ला ठोकल्याची विसंगत माहिती दिली. ए एस आय डगरे याना संशय आल्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक बगळे याना कल्पना दिली असता त्यांना सदर कार जानवली येथील अपघातात असल्याची शंका आली.त्यानुसार चालक अवधूत धुवाळी याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने जानवली येथे दुचाकीला ठोकून घाबरून आपण घटनास्थळावरून पळ काढल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री कारचालकासह कार कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आली. सदर इनोव्हा कार जामसंडे येथील रुमडे यांच्या मालकीची असून दुरुस्तीसाठी कणकवली येथे सोडण्यात आली होती. दुरुस्ती नंतर कार जामसंडे येथे नेत असताना हा अपघात घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!