“काँग्रेसका हात दहशतवादोके साथ”;आमदार नितेश राणे यांची टीका

दाऊद इब्राहिम व त्याच्या हस्तकांची बाजू घेणाऱ्या आमदारांची एसआयटी ने चौकशी करावी

मालेगाव येथे पोलीस आयुक्तालय व्हावे; गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली मागणी

नागपूर (न्युज ब्युराे) : सलीम कुत्ता याच्या संदर्भात काँग्रेस आमदार ज्या पद्धतीने वक्तव्य करत आहेत यातूनच”काँग्रेसका हात दहशतवादोके साथ” हे पुन्हा एकदा सिद्ध झाल आहे. काँग्रेसच्या या आमदारांना दाऊद इब्राहिम आणि त्याचे हस्त यांची एवढी माहिती कशी ? हे दाऊदच्या घरी चहापाणी द्यायला असतात काय? मी तर पुढे जाऊन मागणी करेल दाऊद आणि त्यांच्या हस्तकांबद्दल माहिती देत असलेल्या काँग्रेसच्या त्या आमदारांना एसआयटी ने ताब्यात घ्यावे आणि त्यांच्याकडून या दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती घ्यावी. अशी मागणी आमदार नितेश राणे माध्यमंशी बोलताना नागपूर येते केली. दरम्यान मालेगाव येथे पोलीस आयुक्तालय व्हावे अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मालेगावचे स्थानिक खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखाली केली असल्याचेही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

नागपूर विधान भवनाच्या आवारात माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे यांच्या समवेत खासदार डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर शेषराव पाटील, वकील शिशिर हिरे, आर.एस.एस. चे प्रदीप बच्छाव आदी उपस्थित होते.

मालेगाव हा विषय सातत्याने दहशतवादाचे केंद्रबिंदू बनला आहे. या ठिकाणी लव्ह जिहाद, लैंड जिहाद,तसेच गांजा, ड्रग ,यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला आहे. गुन्हेगारी वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता मालेगाव साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय असणे गरजेचे आहे.आणि त्यासाठीच खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे समवेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलीस आयुक्तालयाची मागणी केली आहे.असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

काँग्रेसचे आमदार दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या हस्तकांबद्दल बोलतात. त्यांच्या कुटुंबीयांची माहिती देतात. हा प्रकारच गंभीर आहे.मुंबई बॉम्बस्फोटात जे मृत्यू झाले ते कोणत्या पक्षाचे किंवा धर्माचे नव्हते. जनसामान्यांचे मृत्यू झाले याची जाणीव काँग्रेस पक्ष आणि आमदारांना असणे गरजेचे आहे. दहशतवादी अंडरवर्ल्ड अशा देशद्रोह्यांची बाजू घेऊन बोलणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना एसआयटी ने चौकशी साठी बोलवावे आणि वस्तुस्थिती जाणून घ्यावी. आता त्या आमदारांनी हे सुध्दा सांगावे की दाऊद इब्राहिम वर विष प्रयोग झाला आहे आणि तो जिवंत आहे की मेल आहे.हे पण त्यांनी जाहीर करावे हिम्मत असेल तर अशा आमदारांनी विधानसभेच्या फ्लोअरवर या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान सुद्धा यावेळी नितेश राणे यांनी दिले.

error: Content is protected !!