आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब गावचे माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची शिवसेना आचरा विभाग प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांनी तसे नियुक्तीपत्र चंद्रकांत गोलतकर यांना सुपूर्द करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हा प्रमुख संजय आग्रे व तालुका प्रमुख महेश राणे यांनी ही नियुक्ती केली. चंद्रकांत गोलतकर यांनी शिवसेना नेते उद्योजक किरण सामंत यांच्या उपस्थितीत नुकताच ठाकरे गटातून शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना आचरा विभाग प्रमुखपदी चंद्रकांत गोलतकर यांची नियुक्ती..!












