कणकवली (प्रतिनिधी) : शिवीगाळ केल्याचा राग येऊन कणकवलीत एका युवकाला आज सायंकाळी बेदम चोपण्यात आले.दरम्यान प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर दोन्ही बाजूच्या युवकांनी पोलीस ठाणे आवारात गर्दी केली होती. नाहक गर्दी झालेली पाहून वरिष्ठ अधिकाऱ्याने खाकी भाषेत समजावल्यानंतर ही गर्दी पांगली. कणकवलीत कांबळी गल्ली येथे भालचंद्र महाराज मठानजीक युवकांची शाब्दीक बाचाबाची झाली. शिवीगाळ करणाऱ्या त्या युवकाला तेथील व्यवसायिक असलेल्या युवकांनी समजावून पाहिले. तरीही अर्वाच्च शिवीगाळ केल्याचे म्हणत समजावणाऱ्या दोन युवकांनी त्या शिवीगाळ करणाऱ्याला बेदम चोपले.प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पुढील कारवाई चे काम सुरू होते.
कणकवलीत युवकांची बेदम मारामारी ; प्रकरण पोलीस ठाण्यात












