सख्खा भाऊ बनला पक्का वैरी ; बेदम मारहाणीत नारायण कावले चा मृत्यू

सख्ख्या भावासह, पुतण्या व अन्य दोन महिलांवर खुनाचा गुन्हा दाखल

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : अंगणात गाडी लावल्याच्या रागातून झालेल्या वादात बेदम मारहाण करण्यात आल्याने गंभीर जखमी झालेल्या सोन्सुरे-आरवली येथील नारायण महादेव कावले (वय ५०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे तीनच्या सुमारास घडली. दरम्यान याप्रकरणी त्यांचा मुलगा वैभव याने दिलेल्या तक्रारीनुसार सख्या काकासह पुतणा व दोन महिला असे मिळून चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कृष्णा नारायण कावले (वय ६७), कांचन कृष्णा काढले (वय ५९), सुहास सुमंत कावले. (वय ४५) समीक्षा सुहास कावले (वय ४०) अशी त्यांची नावे आहेत. तसेच त्यांना तात्काळ अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वेंगुर्ले पोलिस ठाण्याचे निरिक्षक अतुल जाधव यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अंगणात गाडी लावल्याच्या रागातून नारायण कावले व त्यांचा मुलगा वैभव यांना त्याच्या काका-काकी व पुतण्याकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. हा गुन्हा १७ तारखेला सोन्सुरे येथे घडला होता, पात श्री. कावले यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले होते. परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करुन पुन्हा घरी सोडण्यात आले. त्यानंतरही त्यांना त्रास होत असल्यामुळे पुन्हा बांबुळी येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची आज पहाटे प्राणज्योत मालवली. दरम्यान बेदम मारहाण झाल्याने त्यांच्या आतडे व गुप्तांगाला गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, असा अंदाज तेथील वैद्यकिय अधिकान्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी त्यांच्या काका, पुतण्यासह अन्य दोन महिला अश्या बौघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

पातील दोन्ही गटाचा जमिन जागेच्या कारणावरुन गेली अनेक वर्षे वाद होता. पातून त्यांच्यात नेहमी खटके उडत असत. परंतु १७ तारखेला अंगणात गाडी लावल्याच्या रागातून त्यांचा मुलगा वैभव पाला गाडीत रोखून मारहाण करण्यात आली. त्याने आरडा ओरड केल्यानंतर त्याला सोडविण्यासाठी वडील नारायण धावले. यावेळी त्यांनाही हाताच्या ठोश्याने आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अहवाल मिळाल्यानंतर बौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज सायंकाळी उशिरा मृत नारायण पाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उशिरा ज्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पक्षात पनी मुलगा असा परिवार आहे. श्री. कावले हे परिसरात सुतारकाम करीत होते.

error: Content is protected !!