धामापूर ब्राम्हणदेव मंदिर व श्री देवी भगवती मंदिर येथे निलेश राणे यांची सदिच्छा भेट
ग्रामस्थांच्या वतीने निलेश राणे यांचा सत्कार
चौके ( अमोल गोसावी ) : धामापूर गावात तलाव सुशोभभिकरण, पोयचा कालवा बंधारा यासाठी 10 लाख, रस्ता कामासाठी 5 लाख डीपीडीसी मध्ये मंजूर झाले आहेत. ग्रामस्थांच्या मागणी नुसार अधिकधिक विकास करण्यासाठी, विकासकामांतून आदर्श गावे निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भाजप नेते निलेश राणे यांनी गुरुवारी धामापूर येथे बोलताना स्पष्ट केले. धामापूर खालचावाडा (गावडेवाडी) येथील ब्राम्हणदेव मंदिरावर वादळात झाड कोसळून मोठे नुकसान झाले होते. ग्रामस्थानी याबाबत निलेश राणे यांचे लक्ष वेधताच निलेश राणे यांनी 50 हजार मदत तात्काळ दिली. मंदिर दुरुस्ती काम करण्यात आले. निलेश राणे गुरुवारी धामापूर दौऱ्यावर असताना ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. मात्र निलेश राणे नम्रपणे म्हणाले, करण्यात आलेली मदत हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत, गावा गावात अधिकाधिक विकासकामे, रोजगार निर्मिती यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी जिप सदस्य संतोष साटविलकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, सौरभ ताम्हणकर, राकेश सावंत, निषय पालयेकर, सरपंच सौ. मानसी महेश परब उपसरपंच रमेश निवतकर, सदस्य प्रशांत गावडे, तेजस्विनी भोसले धामापूरकर, महेश परब, महेश धामापूरकर, प्रताप चव्हाण, बाबू तोरसकर, अभिषेक भोसले, प्रकाश सावंत, अमोल परब, सचिन गावडे, उल्हास थवी, मनीष गावडे, ज्ञानेश्वर परब, गणपत म्हापसेकर, संतोष मराठे, सुशील घाडी,दर्शन परब, सिद्धेश परब, सत्यवान गावडे, श्रीकृष्ण शेटये, तुकाराम मराठे, दीपक गावडे, सत्यवान नाईक, शेखर मराठे, प्रकाश भोसले, योगेश काळसेकर, रामचंद्र सावंत, ललिता सावंत, चेतन मुसळे, यशश्री मुसळे यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
निलेश राणे यांनी धामापूर भगवती मंदिर देवालय येथेही दर्शन घेतले. तसेच धामापूर तलाव परिसर पाहणी केली. येथे तलाव परिसर सुशोभिकरण कामासाठी 3 कोटी प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.












