चाचण्यांचे प्रमाण वाढवा, पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश
सिंधुदूर्ग (प्रतिनिधी): देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज आरोग्य यंत्रणेची बैठक घेतली. चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, चाचण्या करण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञांची नेमणूक करावी, जिल्ह्यात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील आदी उपस्थित होते.