बलात्काराच्या गुन्ह्यात नांदगाव मधील कमलेश मोरये ला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

लग्नाचे आमिष दाखवून केले मातृत्व प्रदान ; महिलेशी ठेवले अनैसर्गिक संबंध

आनंद तांबे (कणकवली) : पुणे आकुर्डी येथील महिलेला लग्नाचे आमिष दाखवून मातृत्व प्रदान केल्याच्या गुन्ह्यात कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील कमलेश सुरेश मोरये ( वय 39 ) याला आकुर्डी पुणे येथील पोलीस पथकाने आज सकाळी कणकवली पोलिसांच्या साहाय्याने बेड्या ठोकल्या. पीडित महिलेने निगडी ,पुणे येथील पोलीस ठाण्यात 22 डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कमलेश सुरेश मोरये ( रा. नांदगाव तिठा , ता. कणकवली ) याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेसोबत 28 नोव्हेंबर 2020 ते 17 ऑक्टोबर 2023 दरम्यान शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडिता गर्भवती राहून तिला मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतरही कमलेश ने पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. कमलेश याने पीडित महिलेला 3 वेळा गर्भपात करायला भाग पाडले. तसेच तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवले, तिच्याशी लग्न केले नाही. कमलेश पासून झालेल्या मुलीची जबाबदारी न घेता तो आपल्या मूळ गावी निघून गेला. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी कमलेश सुरेश मोरये याच्यावर आयपीसी 376 (2 ) एन , 377, 323 नुसार निगडी ,पुणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या शोधात पुणे पोलिसांनि कणकवली गाठली आणि कणकवली पोलिसांच्या मदतीने आरोपी कमलेश मोरये याच्या नांदगाव तिठा येथील राहत्या घरातून आज सकाळी मुसक्या आवळून पुणे येथे घेऊन गेले. या प्रकारामुळे नांदगाव गावात खळबळ उडाली आहे.

error: Content is protected !!