पूज्य.साने गुरूजी जयंतीनिमित्ताने बाल कला क्रीडा मेळाव्याचे आयोजन
खारेपाटण (प्रतिनिधी) : श्रमजीवी संघटना महाराष्ट्र ची पुढची पिढी असलेल्या श्रमजीवी बाल संघटनेच्या राज्यस्तरीय बाल कला क्रीडा मेळाव्याला नुकताच ऊसगाव डोंगरी ता.वसई जि.पालघर येथील साने गुरूजी प्रशिक्षण संकुलात प्रारंभ करण्यात आला.
आदिवासी डोंगराळ व दुर्गम भागातील मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा ,त्यांना पारंपारिक कला गुणांची व खेळांची माहिती ,आवड निर्माण व्हावी. यासाठी पूज्य.साने गुरूजी जयंतीचे औचित्य साधून दि.२३ ते २५ डिसेंबर, २०२३ रोजी राज्य स्तरीय भव्य बाल कला क्रीडा मेळावा आयोजीत करण्यात आला आला आहे.आशी माहिती कला क्रीडा मेळावा समिती व व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांतून दुर्गम गाव पाड्यांतील श्रमजीवी संघटना सभासदांची बालक मुले मुली या मेळाव्यात सहभागी झाली आहेत.
















