खारेपाटण कोष्टी आळीत अवैध दारू पकडली

एलसीबी ची आरोपी राजेंद्र रोडी वर कारवाई

कणकवली (प्रतिनिधी) : खारेपाटण कोष्टी आळी येथील राजेंद्र महादेव रोडी ( वय 54 ) याच्या ताब्यातून गोवा बनावटीची 11 हजार 800 रुपयांची गोवा बनावटीची दारू एलसीबी च्या पथकाने पकडली. एलसीबी पोलीस उपनिरीक्षक आर बी शेळके यांच्या नेतृत्वाखाली एलसीबी हवालदार राजेंद्र जामसंडेकर, हवालदार आशिष जमादार, किरण देसाई यांच्या पथकाने आज दुपारी वाजून 5 मिनिटांनी ही कारवाई खारेपाटण कोष्टी आळी येथे करण्यात आली. हवालदार किरण देसाई यांच्या फिर्यादीनुसार आरोपी राजेंद्र रोडी वर गुन्हा दाखल करण्यात आला असून खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव उकंडी साबळे अधिक तपास करत आहेत.

error: Content is protected !!