आंब्यावरील फळमाशीचे नियंत्रणाकरिता फेरोमोन सापळे आणि लुर्स करिता अनुदान – तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे

देवगड (प्रतिनिधी) : तोक्ते चक्रीवादळ झाल्यापासून आंबा बागेत फळमाशीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात झाल्याचे आढळून आले आहे.आंबा फळमाशीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आंब्याची प्रत घसरली असून विक्री व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊन आंबा बागायतदारांचे आर्थिक नुकसान होत आहे.हे आर्थिक नुकसान लक्षात घेता सिंधुदुर्ग समृद्ध योजना अंतर्गत आंबा पिकावरील फळमाशीचे सामूहिकपणे नियंत्रण करण्यासाठी 75 टक्के अनुदानावर प्रति हेक्टरी 4 फेरोमोन सापळे आणि 4 लुर्स अनुदानावर देण्यात येणार आहे.

सदरचे फेरोमोन सापळे आणि लुर्स हे आंबा बागायतदारांनी सामूहिकपणे आपल्या आंबा बागेत लावायचे आहे,जेणेकरून सामूहिक स्वरूपात फळमाशीचा प्रादुर्भाव कमी होऊन फळमाशीचे नियंत्रण आटोक्यात येण्यासाठी मदत होईल.

प्रस्तुत फेरोमोन सापळे आणि लुर्स ची मागणी करण्यासाठी आपले गावाचे संबंधित कृषी सहाय्यक यांना संपर्क करून त्यांचेकडे आपला मागणी अर्ज सादर करावा.या अर्जासोबत सातबारा उतारा जोडणे आवश्यक आहे.तरी सर्व आंबा बागायतदारांनी आपण व आपल्या परिसरातील सर्व आंबा बागायतदार यांना फेरोमोन सापळे व लुर्स ची मागणी करणेसाठी अर्ज करणे बाबत अवगत करावे.जेणेकरून आंबा बागेच्या 100 % क्षेत्रावर सामूहिकपणे फेरोमोन सापळे आणि लुर्स चा वापर केल्यास फळमाशीचे नियंत्रण करणे सोपे होईल. यासाठी सर्व आंबा बागायतदार यांना आवाहन करण्यात येते की,या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, देवगड कैलास ढेपे यांनी केले आहे.

error: Content is protected !!