करुळ ग्रा. पं. च्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न

शिबिरात ४६ जणांची तपासणी : २२ रुग्णांची होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया

वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत करूळ व बी.के.एल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरात एकुण ४६ जणांची तपासणी करण्यात आली. यातील २२ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी शिबिर पार पडले.याशिबिरात वालावलकर रुग्णालय डेरवणचे डॉ.सागर पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी करुळ सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच सचिन कोलते, माजी पं. स. सदस्य बाळा कदम,माजी सरपंच हिंदुराव पाटील, दत्ताराम साटम,ग्रा.पं.सदस्य भास्कर सावंत,रेखा सरफरे,दिपाली जामदार,सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पेडणेकर नाधवडे,रवींद्र सरफरे,राजेंद्र गुरव, ग्रामसेवक शशिकांत गुरव,आरोग्य सेविका पल्लवी तावडे, आरोग्य सेविका दर्शना देसाई,आशाताई नम्रता वळंजू, जान्हवी पांचाळ,व नागरिक उपस्थित होते.

करुळ ग्रामपंचायतच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची त्यांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी, धनगर समाज बांधव यांची आरोग्य तपासणी,वैभववाडी तालुका पत्रकार समिती, सह्याद्री जीव रक्षक करूळ व ग्रामपंचायत करुळ यांच्या वतीने करुळ घाट स्वच्छता मोहीम, महीलांसाठी विविध स्पर्धा,शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम,रानभाजी महोत्सव आदी उपक्रमांचा समावेश आहे.

मोतीबिंदू तपासणी शिबिरातील २२ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया लवकरच डेरवण येथे करण्यात येणार आहे. शिबिर यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी,आरोग्य सेविका,व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!