नारिंग्रे येथे उद्या दत्तजयंती उत्सव!

मसुरे (प्रतिनिधी) : दत्त प्रासादिक मंडळ पूर्व विभाग जोगवलवाडी, नारींग्रे यांच्यावतीने २६ डिसेंबर रोजी दत्तजयंती उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.सकाळी ८:०० वा.अभिषेक, सद्गुरू,नामाचे हवन,महापूजा, दुपारी १२:३० वा. ते २:३० वा.महाप्रसाद,सायं. ४:३० ते ६:३० वा. किर्तन व दत्तजन्म किर्तनकार ह.भ.प. अमित धाकोजी सावंत (मुणगे सावंतवाडी),सायं. ६:३० ते ८:०० वा. दत्त पालखी सोहळा,रात्री ९:०० ते १०:०० वा. ग्रामस्थांची भजने,रात्री १०:०० वा. श्री रोहित गोंधळी प्रस्तुत श्रीदेव घोडेश्र्वर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ” हर्षदा सत्व परीक्षा ” होणार आहे. उपस्थिती चे आवाहन श्री दत्त प्रासादिक मंडळ,नारींग्रे / श्री दत्त जयंती उत्सव मंडळ, नारिंग्रे यांनी केले आहे.

error: Content is protected !!