आशिये ठाकूरवाडी बहुउद्देशीय सभागृहाच्या कामाचे भुमिपुजन
कणकवली (प्रतिनिधी) : आशिये गावामध्ये विविध विकासकामे केंद्रीय मंत्री नारायण राणे,आमदार नितेश राणें यांच्या केली जात आहे.या ठाकूरवाडी मध्ये आपल्या सर्वांची एकी फार महत्तवाची आहे.ठाकर समाजाने या वाडीमध्ये जे काम केलं आहे ते केवळ एकीच्या माध्यमातून झाले आहे.या ठाकूरवाडी मध्ये राणेंच्या माध्यमातून सर्वागीण विकास साधला जाईल,आम्ही केवळ निमित्त आहोत.त्यामुळे ओपण जीम असेल,सार्वजनिक विहिर व अन्य विकास कामे मार्गी लावण्यात आली.आपल्या सर्वांची ताकद राणेंच्या पाठीशी कायम ठेवा.जी विकास कामे असतील ती भारतीय जनता पार्टी व आ.नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावली जातील असा विश्वास भाजपा उपाध्यक्ष तथा जिल्हापरिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी व्यक्त केला.
आशिये ठाकूरवाडी बहुउद्देशीय सभागृहाच्या कामाचे भुमिपुजन जिल्हापरिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी आशिये सरपंच महेश गुरव,भाजपा उपाध्यक्ष सोनु सावंत,उपसरपंच संदीप जाधव,माजी सरपंच सदानंद बाणे,मंडळाचे अध्यक्ष उमेश ठाकूर , शिक्षक निलेश ठाकूर,ग्रामपंचायत सदस्य सुहास गुरव,माजी उपसरपंच प्रविण ठाकूर, संजना ठाकूर,लक्ष्मण ठाकूर,सत्यविजय गवाणकर,श्रीधर ठाकूर,सदानंद ठाकूर,प्रसाद म्हस्कर, निलेश गवाणकर,निलेश ठाकूर,समीर ठाकूर,सचिन ठाकूर,दत्तप्रसाद ठाकूर,मनोज गवाणकर, वैभव ठाकूर , सत्यवान ठाकूर,सुर्यकांत ठाकूर,राजेश ठाकूर,संकेत ठाकूर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच महेश गुरव म्हणाले,आशिये ठाकूरवाडी बहुउद्देशीय सभागृहासाठी आ. नितेश राणेंच्या माध्यमातून 10 लाखाचा निधी मंजुर झालेला आहे.या वाडीतील विविध विकास कामे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिला जाईल.या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत पुच्छपुच्छ देवून करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश ठाकूर यांनी केले.












