गोळवण येथे भाजप नेते डॉ निलेश राणे यांच्या हस्ते २७ रोजी विविध विकास कामांचा शुभारंभ!

मसुरे (प्रतिनिधी) : गोळवण येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ २७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४:०० वा. भाजप नेते डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

डोंगरी विभाग विकास कार्यक्रम अंतर्गत गोळवण रवळनाथ मंदिर घाटीमाथा ते घाडीवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे १०.०० लक्ष,जि. प. २० टक्के सेस अनुदान गोळवण ग्रा.पं. ऑफिस ते गोळवण बौद्धवाडी (समतानगर) जोडरस्ता तयार करणे. – ४.०० लक्ष, जि. प. स्वनिधी, जि.प.शाळा गोळवण नं. २ इमारत दुरुस्ती करणे. – ३.०० लक्ष आदी कामांचा समावेश आहे.उपस्थितीचे आवाहन गोळवण-कुमामे-डिकवल सरपंच सुभाष लाड,उपसरपंच शरद मांजरेकर,ग्रा सदस्य यांनी केले आहे.

error: Content is protected !!