पोलिसांनी कारवाई केलेले ” हे ” आहेत ऑनलाईन जुगार एजंट

“आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज ” च्या बातमीनंतर कणकवली पोलिसांची धडक कारवाई

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऑनलाईन जुगारावरची पहिली पोलीस कारवाई

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल ने ऑनलाईन जुगाराविरोधात सातत्याने बातम्या लावल्यानंतर कणकवली पोलिसांनी धडक कारवाई करत कणकवलीतील 6 जुगार एजंट वर धडक कारवाई केली. ऑनलाईन जुगार एजंट ना थेट त्यांच्या घरातून पोलिसांनी उचलून पोलीस ठाण्यात आणले. आज दुपारी ही धडक कारवाई करताना काही संशयित आरोपी हे आंघोळ करत होते, तर काही घरात टीव्ही बघत होते.सुरवातीला या संशयितांना पोलीस कशासाठी आलेत आणि आपण नेमके काय केलेय याचाही अंदाज आला नाही. एकेकाच्या घरी जाऊन पोलिसांनी या सहाही ऑनलाईन जुगार एजंटची वरात पोलीस ठाण्यात आणली.उत्तम वाळके,सचिन शिरसाट,मयूर महाडेश्वर, प्रथमेश चव्हाण, प्रीतम म्हापसेकर, भावेश चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील ही पहिलीच कारवाई ठरली असून पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह सर्व पोलीस दलाचे पालक वर्गातून कौतुक होत आहे. ही कारवाई झाल्याचे समजताच जुगार खेळणाऱ्या अननेकांनी आपल्या मोबाईलमधून खेलो जितो हे ऍप डिलीट केले. मात्र प्ले स्टोअरमधून डिलीट केलेले सर्व ऍप रिस्टोअर केले जातात या माहितीपासून ते अनभिज्ञ असल्याने तो मी नव्हेच च्या आवेशात काहींनी आपले मोबाईल पोलिसांकडे दिले. मात्र प्ले स्टोअरमधून डिलीट ऍप रिस्टोअर करताच त्यांचेही पितळ उघडे पडले. दरम्यान वरील सर्व आरोपींवर मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार कारवाई करण्यात आली असून सहाही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सर्व आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले असले तरी या गुन्ह्यात कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागणे चुकलेले नाही. कणकवली पोलिसांच्या कारवाईचे समाजातून कौतुक केले जात असून यापुढेही ऑनलाईन जुगार खेळला जाईल तेव्हा पोलीस दलाने सतर्क राहत अशा कारवाईत सातत्य राखावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!