चिंदर नागोचीवाडी रस्ताचे भूमिपूजन….!

भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,भाजप चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांची प्रमुख उपस्थिती

आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक नियोजन मधून पाच लाख रुपये मंजूर झालेल्या नागोचीवाडी रस्त्यांच्या खडीकरण व डांबरीकरणांचे भूमीपूजन भाजपा मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या उपस्थितीत रवी पडवळ यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी बोलताना चिंदरकर म्हणाले,भौगोलिक दृष्ट्या चिंदर गाव मोठा असून,आपल्या राहिलेल्या रस्त्यांचे काम टप्या टप्याने पुर्ण करु.विकसित कामामध्ये स्थानिक नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच चारकोप विधान सभा महामंत्री योगेश पडवळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश क्रांती करीत आहे. आपणही मोदींच्या योजना सर्व साधारण नागरिकांन पर्यंत पोहोचवल्या पाहिजे, 550 वर्षांची राममंदिराची प्रतिक्षा संपली असून येत्या 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राममंदिराचे उद्घाटन होणार असून प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात दिवाळी साजरी करुया.

यावेळी चिंदर गावचे उपसरपंच सरपंच दिपक सुर्वे, भाजपा चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ, चिंदर नागोची वाडी युवक मंडळाचे अध्यक्ष यदुनाथ पडवळ,सतिश नलावडे, रविंद्र पडवळ,अनिल पडवळ,भक्ती पडवळ, तेजश्री पडवळ,सानिका पडवळ,विष्णू पडवळ, परेश पडवळ व इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!