वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील वेंगसर आजीवली मार्गावर अज्ञात इसमाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांना खबर मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सदर इसम हा दारु पिऊन पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता परिसरात वर्तवली जात आहे. मात्र यावर खरे कारण आणि ओळख ही पोलीस तपासातच समजून येणार आहे.
वैभववाडी तालुक्यातील वेंगसर आजीवली मार्गावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ












