उबाठा सेनेच्या रहाटेश्वर ग्रामपंचायत सरपंच कल्पना बलवंत कदम यांचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश
देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना उबाठा च्या रहाटेटेश्वर ग्रामपंचायत सरपंच कल्पना बलवंत कदम, ग्रामस्थ विनय कदम यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.राटेश्वरच्या सरपंच कल्पना कदम या शिवसेना उबाठाच्या सरपंच होत्या यामुळे ग्राम पंचायतीतील उभाठाची उरलीसुरली सत्ताही कल्पना कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे संपली आहे
यावेळी माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे,अमित कदम सुरेंद्र कदम तालुकाध्यक्ष डॉक्टर अमोल तेली तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार नितेश राणे हेच ग्रामीण भागाचा विकास करू शकतात हे लक्षात आल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केला असे कल्पना कदम यांनी सांगितले .कल्पना कदम यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने विशेषतः शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांना चांगलाच धक्का बसला आहे.












