विनयभंग सह मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपी रुपाली मोटे, शांताराम चव्हाण यांचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : खानावळीच्या व्यवसायासाठी वापरास दिलेल्या मांगराच्या वादातून लाकडी दांडा आणि पाईप ने दाम्पत्याला मारहाण करून फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात आरोपी शांताराम उर्फ कृष्णा भास्कर चव्हाण, रूपाली रत्नाकर मोटे ( दोघे रा.तारकर्ली, मालवण ) यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एच बी गायकवाड यांनी फेटाळला. सरकारी वकील रुपेश देसाई यांनी सरकार पक्षाच्या वतीने यशस्वी युक्तिवाद केला. 23 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोपीनि फिर्यादी व त्याच्या पत्नीला मारहाण करत फिर्यादीच्या पत्नीचा विनयभंग केला होता. फिर्यादीने दिल्या फिर्यादीनुसार मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी रुपाली मोटे व शांताराम चव्हाण यांनी जामीनासाठी केलेला अर्ज आज फेटाळण्यात आला.

error: Content is protected !!