” जनतेला जागृत करा , बाबा बुवांचे धंदे बंद होतील” – हरिभाऊ पाथोडे

चौके (प्रतिनिधी) : “सर्व महाराष्ट्रभर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बाबा ते ज्योती प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शाळा , कॉलेज तसे गावागावात व्याख्यानाचे आयोजित केले जात आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या अभाअंनिसच्या वतीने शाळा , कॉलेज व गावागावामध्ये जाऊन गाडगेबाबा स्मृती दिन ते सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिनापर्यंत प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करा . लोकांना जागृत केल्यानंतर आपोआपच सर्व धर्मातील बुवा , बाबांचे धंदे आपोआपच बंद होतील. ” असे प्रतिपादन राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी केले .

सिंधुदुर्ग जिल्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची विशेष सभा अँड. राजीव बिले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शासकीय विश्रामगृह कणकवली येथे पार पडली . त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते . यावेळी त्यांच्या सोबत विचारपीठावर राज्य उपाध्यक्ष रविंद्र खानविलकर , मुंबई आयटी प्रमुख शशी गमरे , रत्नागिरी संघटक योगेश पवार , सिंधुदुर्ग जिल्हा संघटक विजय चौकेकर , जिल्हा उपाध्यक्ष अजित कांबळे व आनंद धामापुरकर , कार्याध्यक्ष अनिल चव्हाण , खजिनदार जयराम डांबरे , सहकार्याध्यक्ष महेंद्र कदम , मार्गदर्शक विजय शेट्टी , डॉ . सतीश पवार , नितीन वाळके .तालुका संपर्कप्रमुख रामा ठाकूर ,सिद्धार्थ कांबळे आधी उपस्थित होते . राज्य उपाध्यक्ष रवींद्र खानोलकर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की अभाअंनिसमिती गेले 41 वर्ष आमचा देव धर्माला विरोध नाही , मात्र देव धर्माच्या नावाखाली लुबाडणूक करणाऱ्या विरुद्धचा लढा आहे . हा मूख्य उद्देश घेऊन काम चालू केले . देव – धर्म आणि अंधश्रद्धा याचा काडी मात्र संबंध नाही . आदीमानवामध्येही देव हि संकल्पना अस्तित्वात नसतानाही अंधश्रद्धा अस्तित्वात होत्या . त्यामुळे समितीने देव आणि धर्माला कधीच विरोध केला नाही . संतांचे आणि विचारवंतांचे विचार प्रबोधनातून पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहे . विजय शेट्टी यांनी गाडगेबाबांबद्दल वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविणारे विचार आणि कीर्तनांमधून गाडगेबाबा अंधश्रद्धेवर कसे प्रहार करायचे याबाबत विचार मांडले . खारेपाटण येथे गाडगेबाबांचे किर्तन चालू असताना त्यांना त्यांचा मुलगा गोविंदा यांच्या मृत्यूची तार आल्यावर कृष्णही गेले , रामही गेले. गेले कोठ्यानू कोठी . का रडू एकासाठी . असे म्हणून त्यांनी आपले कीर्तन पुढे चालू करून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला .यावेळी समितीने बाबा ते ज्योती यात्रेच्या निमित्ताने प्रबोधन यात्रेचे आयोजन केले त्याचा उद्देश स्पष्ट करून विविध ठिकाणी केलेल्या प्रबोधन यात्रेची माहिती समिती सदस्यांना देऊन त्या त्यावेळी सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले . यावेळी समिती सदस्य अनिल चव्हाण, अनिल कदम, प्रभाकर चव्हाण, नामदेव मठकर , चंद्रशेखर चौकेकर , भूषण मेस्त्री , गिरीश चव्हाण आधी सदस्य व कार्यकर्ते उपलब्ध होते . कार्यक्रमाचे आभार सहसचिव संजय खोटलेकर यांनी केले.

error: Content is protected !!