विनम्र आणि तत्पर नेत्रसेवेच्या 5 व्या वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी हटके ऑफर
चष्मा खरेदीवर फ्रेम मोफत, एका गॉगल खरेदीवर दुसरा गॉगल फ्री
बजाज फायनान्सने लोन वर चष्मा खरेदीची सुविधा उपलब्ध
कणकवली (प्रतिनिधी) : अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स कणकवलीचा 5 वा वर्धापनदिन 1 जानेवारी 2024 रोजी साजरा होत असून यानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन सनराईज टॉवर महाडिक कंपाउंड, नरडवे फाटा येथील स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स मध्ये करण्यात आले आहे. ग्राहकांना विनम्र आणि तत्पर सेवा देतानाच विक्रीनंतर मोफत रिपेरिंग सेवा देत ग्राहकांचे समाधान करणारे स्पेक्टो मार्ट ऑप्टिकल्स नेत्रसेवेची 5 वर्षे पूर्ण करत आहे. यानिमित्त स्पेशल ऑफर देण्यात आली असून चष्मा खरेदीवर फ्रेम मोफत, एक गॉगल खरेदीवर दुसरा गॉगल चक्क फ्री मिळणार आहे. बजाज फायनान्सवर लोन वर चष्मा खरेदीची सुविधाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच स्पेक्टो मार्ट जे उपलब्ध केली आहे. वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायण पूजेला उपस्थित राहून तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मायबाप एंटरप्रायजेसचे मंगेश चव्हाण व कुटुंबीय यांनी केले आहे.













