खारेपाटण हायस्कूल चा एन सी सी कॅडेट अथर्व जाधव याची केरळ येथील ट्रेकिंग कॅम्प साठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालया खारेपाटण या हायस्कूलच्या इयत्ता नववीत शिकणारा ५८ – महाराष्ट्र बटालियन एन. सी.सी.- ज्युनियर डिव्हिजनचा कार्पोरल अथर्व ऋषिकेश जाधव याची केरळ येथे दि.२२ते २९ डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित केलेल्या All India NCC Trekking Camp, kulmavu-kerala येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५ कॅडेट्समध्ये निवड झाली होती, तो कॅम्प त्याने यशस्वीरित्या पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

तसेच या कॅम्पसाठी संपूर्ण देशभरातून आलेल्या ५१० कॅडेट्सपैकी बेस्ट परफोंन्स साठी ४ कॅडेट्सची निवड झाली व त्यांना गोल्ड मेडल – सन्मानचिन्ह देण्यात आले.या ४ जणांमध्ये खारेपाटण हायस्कूल चा अथर्व जाधव यालाही गोल्ड मेडलl देऊन गौरविण्यात आले आहे.या त्याच्या यशात त्याच्या आईबाबांचे प्रोत्साहन तसेच एन सी सी ट्रुप कमांडर उत्तम कापसे सर यांचे मार्गदर्शन लाभले. अथर्व ऋषिकेश जाधव याच्या यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे व सर्व संचालक मंडळ सदस्य तसेच शेठ न.म.विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सानप व इतर शिक्षक वृंद तसेच पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांनी अथर्वचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!