वेताळ बांबर्डे येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

कुडाळ (प्रतिनिधी) : वेताळ बांबर्डे येथे नव्याने सुरू होत असलेल्या वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच उद्घाटक भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी या कार्यालयातुन जनहिताची काम करा इथे आलेला कुठलाही व्यक्ती इथून नाराज होऊन जाऊ नये याची काळजी घ्या अश्या शब्दात निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ तालुका खरेदी विक्री संघ अध्यक्ष दीपक नारकर, लोकसभा संयोजक देवेन सामंत, संध्या तेरसे, दिपलक्ष्मी पडते, पप्या तवटे, रुपेश कानडे, आनंद शिरवलकर, प्राजक्ता शिरवकर, भास्कर गावडे, अवधूत सामंत, आरिफ मुजावर यासाहित वेताळ बांबर्डे, गिरगाव, कुसगाव, नारूर, हिर्लोक भागातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!