छावा संघटनेची मराठा आरक्षण साठी भव्य मोटर रॅली

छावा संघटना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत, सौधन अपराध यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटार रॅली

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत , त्याला यश मिळावे या करीता समस्त मराठा समाजाला एकत्र करून शांततेत अंदोलन करत आहेत .या अंदोलनासाठी समस्त मराठा समाज जाहीर पाठिंबा वेगवेगळ्या माध्यमातून देत आहेत .याच आरक्षणासंदर्भात विविध मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या जाहीर सभा लाखोच्या संख्येने होत आहेत .महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासाठी खूप आश्वासन देत दिरंगाई होत आहे त्या निमित्त सरकारला जाहीर इशारा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील साहेब हे मराठा समाजाला एकत्रित घेऊन मुंबईमध्ये आपलं शांततेचे आंदोलन सुरू ठेवणार आहेत .

याच आंदोलनाला पाठबळ देणेसाठी छावा संघटना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजू सावंत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटार रॅली चे नियोजन अर्धा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून दसरा चौकापर्यंत करण्यात आले रँली अर्ध शिवाजी पूतळा,महाद्वार रोड,पापाची तीकटी,शीवाजी चौक छत्रपतींना अभिवादन करुन बींदू चौक मार्गे दसरा चौक येथे वीसर्जीत झाली .

या रँलीची सुरुवात करताना अध्यक्ष राजू सावंत यांनी भाषण केले त्यावेळेला ते बोलत असताना म्हणाले की मराठा समाजाला सध्या आरक्षणाची खूप गरज आहे मराठा समाजातील मुले शिक्षणामध्ये पुढे असून सुद्धा आरक्षण नसल्याकारणाने ते पाठीमाग पडत आहेत त्यांचे शिक्षण होऊन सुद्धा त्यांना सरकारी नोकरी मिळत नाही त्यांचं होणारे नुकसान याला थांबवण्यासाठी खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आपल्याला हवे आहे आणि हे हक्काचा आरक्षण मनोज रंगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने लवकरात लवकर द्यावे अशी त्यांनी विनंती केले आहे हे आरक्षण लवकरात लवकर न मिळाल्यास उग्र आंदोलन शांततेच्या मार्गातून केले जाण्याचे आवाहन त्यांनी रॅलीच्या माध्यमातून दिले आहे .

याआंदोलनात माननीय बाबा पार्टे ,राहूल इंगवले,शहर अध्यक्ष सौधन अपराध,उपाध्यक्ष राजू भोसले,उपाध्यक्ष पपू चव्हाण, उपाध्यक्ष संग्राम जरग ,पै. बाबा महाडीक,मदन साठे,अध्यक्ष करणसींह पाटील यूवक ,बंटी पाटील,राजू जाधव,तूकाराम साळोखे,उमेश देवकर, रुषी इंगवले,कीशोर घाटगे,श्रीकांत माने, गणेश उर्फ पिंटू पाटील, सुरज जाधव हे मान्यवर उपस्थित होते .

error: Content is protected !!