कणकवली (प्रतिनिधी) : भरधाव एसटी बसची स्कॉर्पिओ कारला धडक बसून कारचे नुकसान झाले.हा अपघात मुंबई गोवा महामार्गावर बेळणे एसटी स्टॉप येथे 8 जानेवारी रोजी रात्री घडला. शुभम पांडुरंग सायंकार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शुभम आपल्या ताब्यातील स्कॉर्पिओ कार ( MH 39 – J – 8111 ) ने गोव्याहून गणपतीपुळे च्या दिशेने जात होते. रात्री जेवणासाठी थांबत असताना कारचा वेग कमी करून डाव्या बाजूला कार घेत असताना पाठीमागून येणाऱ्या एसटी बस ( MH 14 BT – 2384 ) ने स्कॉर्पिओ कारला मागून जोरदार धडक दिली. यात कारचे नुकसान झाले. शुभम सायंकार च्या फिर्यादीनुसार एसटी बस चालक संजय अंबादास मचे याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक पार्सेकर करत आहेत.
एसटीच्या धडकेत स्कॉर्पिओ कार चे नुकसान ; बेळणे येथे नॅशनल हायवेवर अपघात











