सायं.५ वाजल्यापासून पावसाची संततधार सुरूच
वैभववाडी (प्रतिनिधी) : अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने गेल्या आठवड्यात हवामान खात्याने आठवड्याच्या अखेरीस कोकण भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्या नुसार गेले दोन तीन दिवस सर्वत्र वातावरण ढगाळ होते. अखेर सायं.५ च्या सुमारास वैभववाडी शहरासह अन्य ठिकाणी पावसाची संततधार सुरूच राहीली. परिणामी आज आज दुपार पासून हवामानात उष्णतेत प्रचंड वाढ झालेली पहायला मिळाली. अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकरी चिंतेत सापडला असून शेतीच्या इतर कामांसाठी मात्र काही शेतकरी वर्गात नाराजीचा सूर दिसत नाही. त्यामुळे या अवकाळी पावसाने कभी खुशी..कभी गम.. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.











