कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय सेल संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी कलमठ गुरववाडी येथील राष्ट्रवीदी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते रुपेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या नियुक्तीचे पत्र वैद्यकिय सेल प्रदेश अध्यक्ष पंडित गौतम आगा यांच्या हस्ते मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात देण्यात आले.
रुपेश जाधव हे पक्ष स्थापने पासून,विद्यार्थी संघटने पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये ते काम करत आहेत.पक्ष फुटी नंतरही ते पक्षा सोबत राहिले.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचे ते अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जातात.शरद पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय सेल च्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि महाराष्ट्र मधील सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आपण भरीव कार्य करणार आहे.तसेच पक्ष संघटना मजबुतीने उभी करणार असल्याचे रुपेश जाधव यांनी सांगितले.











