6 लाख रुपये खर्चाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली मोफत
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सागवे, राजापूर, जिल्हा – रत्नागिरी येथील रझ्झाक हसन भाटकर हे कॅन्सर ने पीडित रुग्ण होते. त्यांच्या संबंधित उपचार ऑपरेशन ची रक्कम सुमारे सहा लाख अशी होती. मात्र रुग्ण भाटकर यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी देवगड तालुक्यातील गिर्ये येथील जि. प. चे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफभाई बगदादी यांना सम्पर्क केला. त्यावर श्री बगदादी यांनी आमदार नितेश राणे यांचे सहकारी स्वाभिमान ट्रस्ट चे पदाधिकारी तथा आमदार नितेश राणें चे अत्यन्त जवळचे विश्वासू आणि मुंबई मधील सर्व हॉस्पिटल आणि आरोग्य विषयक काम पाहणारे जाहिदभाई खान आणि श्रीमती फेहमीना खान यांना सम्पर्क करून कॅन्सर चे रुग्ण श्री भाटकर यांच्यावर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया पार पाडली.
लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत आणि यशस्वी करून दिल्याबद्दल सागवे येथील भाटकर कुटुंबियांकडून तसेच सागवे गावातील ग्रामस्थांकडून आमदार नितेश राणे, केंद्रीयमंत्री नारायणराव राणे आणि आरिफभाई बगदादी यांचे तसेच स्वाभिमान ट्रस्ट चे जाहिदभाई खान यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.











