अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे अतोनात नुकसान ; शासनाने नुकसानभरपाई द्यावी

भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांचे तहसीलदार ना निवेदन

देवगड (प्रतिनिधी) : अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले असून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आरीफ बगदादी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देत भाजपाने केली आहेदेवगडचे तहसीलदार खत्री यांची आज भेट देऊन हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, देवगड तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी अवकाळी पाऊस पडून आंबा कलमावरील मोहोर व आंबा फळांचे नुकसान झाले आहे.

आंबा उत्पादन समाधान कारक व्हावे या हेतूने खते, किटकनाशके, मेहनत मजूरी, यावर लाखो रुपये खर्च करून अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकन्यांची निराशा केली आहे. आधीच कर्जबाजारी असलेला आंबा वागायतदार, हाता तोंडाशी आलेले आंबा पिक वाया जात असलेले पाहून हताश झाले आहेत. तरी सदर घटनेचे गांभर्भीय विचारात घेवून संबंधीत नुकसानी बावत तातडीने पंचनामे करुन, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाला सूचित करावे तसेच पिक विमा रक्कमेचा पूर्ण परतावा तात्काळ शेतकन्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी संबंधीत कंपन्यांना सूचना कराव्यात हि विनंती कळावे हे निवेदन देण्यासाठी पडेल चे सरपंच भूषण पोकळे, वैभव वारीक, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दया पाटील, कृषी सेलचे अध्यक्ष भूषण बोडस यांच्यासह अनेक जण उपस्थित होते

error: Content is protected !!