शिंदेंची शिवसेना हीच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब 

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांची प्रतिक्रिया

कुडाळ (प्रतिनिधी) : आज जो काही निकाल दिला त्यावर शिवसेना जिल्हा संघटक श्री रुपेश पावस्कर यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे आजचा निकाल ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले.शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी संघटना आहे तसेच विधानसभा अध्यक्ष यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता जे काही बाळासाहेबांचे सत्यवादी विचार आहेत त्याला अनुसरून निर्णय दिला आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन जास्तीत जास्त कार्यकर्ते हे पक्ष प्रवेशासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच या निर्णयामुळे उबाठा गटाने काँग्रेस,राष्ट्रवादी सोबत घरोबा करून बाळासाहेबांचे विचार पायदळी तूडवल्याने हा मोठा हादरा असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना हिंदुत्ववादी संघटना असल्याने आपण या निर्णयाचे स्वागत करतो.शिंदे साहेबांनी आपला शिव धनुष्यबाण काँग्रेस राष्ट्रवादीच्या तावडीतून मुक्त केल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

error: Content is protected !!