लोरे गावात कीड रोग प्रादुर्भाव क्षेत्राला कृषी अधिकाऱ्यांची भेट

पिकपाहणी करत रोगनिवारणाबाबत केले मार्गदर्शन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : मंगळवार 11 ऑगस्ट रोजी लोरे नं 1 गावात किड व रोग प्रादुर्भाव क्षेत्रात कृषि प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे सहयोगी प्राध्यापक डॉ.यशवंत गोवेकर, उप विभागीय कृषि अधिकारी कणकवली, उमाकांत पाटील, तालुका कृषि अधिकारी प्रवीण ओहोळ सरपंच अजय रावराणे यांनी भेट दिली. अल नॅनो च्या प्रभावामुळे यावर्षी पावसाची अनियमितता दिसून येते. भात शेतीची लावणी उशीरा झाल्यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.लोरे नं 1 गावात करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. या प्रादुर्भाव भात प्रक्षेत्राची पाहणी वेंगुर्ला शास्त्रज्ञ डॉ .यशवंत गोवेकर सर यांनी केली. या रोगाचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करण्याची आवश्यकता आहे. जमिनी मध्ये ट्रायकोडर्मा,जैविक बुरशीनाशकाचा वापर केल्यास रोगाचे नियंत्रण करु शक्ततो. तसेच पेरणीपूर्व बियाण्यास मिठाच्या द्रावणाची तसेच बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार रोगप्रतिकारक जातीची लागवड करून करपा रोगाचे नियंत्रण करू शकतो. बियाणे पेरणीपूर्वी तसेच लावणीपूर्वी बांधावरील तणाचा नाश करावा. सेंद्रिय खते तसेच नीम, स्फुरद व पालाशयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.रोगाचा प्रादुर्भाव दिसून येताच पावसाची उघडीप बघून आयसोप्रोथिओलेन ४०% ईसी १० मिली / १० लिटर पाण्यात व दुसरी फवारणी १५ दिवसांनी डायसायक्लोझोल ७५% WP १० ग्रॅम औषध १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या औषधामध्ये पाऊस असल्यामुळे सिलिकॉन स्टिकर 7 मिली प्रति लिटर पाण्यात स्टिकर म्हणून वापर करावा असे मार्गदर्शन गोवेकर सरांनी केले.
यावेळी लोरे नं 1 गावातील सुमन गुरव,हरिश्चंद्र मोसकर, कैलास मोसमकर, संतोष राणे,संजय रावराणे, प्रतिभा रावराणे, स्वप्ना नवले, प्रमोद तेली इ. शेतकऱ्यांच्या भात पिक प्रक्षेत्राची पाहणी केली.यावेळी उपकृषी अधिकारी फोंडाघाट मानसी वेर्लेकर, स.कृ.अ. अक्षया परब व शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!