पर्यटन महोत्सवातून कणकवली शहरवासीयांचे मनोरंजन
कणकवली (प्रतिनिधी) : पर्यटनात मोठी ताकद आहे. मालदीव मध्ये जाणारा पर्यटक आता सिंधुदुर्गात येण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्गातील पर्यटनाबद्दल ट्विट केले. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानेही आपला सुवर्ण महोत्सवी वाढदिवस सिंधुदुर्गात बीचवर साजरा केला. कणकवली शहर हे राणेंचे कुटुंब आहे. मुंबई सारख्या शहरात जो अनुभव आणि आनंद पर्यटन महोत्सवातून मिळते तोच आनंद आणि मनोरंजन माझ्या कणकवली शहरवासीयांना मिळावा यासाठी कणकवली पर्यटन महोत्सवाचे सातत्याने आयोजन करत आहोत. कणकवली नगरपंचायत वर प्रशासक आहेत, सत्तेवर भाजपा नसतानाही आम्ही आमच्या कणकवलीकरांशी असलेली नाळ जोडून ठेवत आम्ही हा पर्यटन महोत्सव आयोजित केला. जेव्हा सगळे विरोधात होते तेव्हा आम्ही कणकवली वासीयांच्या आमच्यावरील प्रेमामुळे आम्ही आमचे नगरसेवक आणि थेट नगराध्यक्ष आम्ही निवडून आणू शकलो. महाविकास आघाडीच्या काळात कणकवली शहराच्या विकासनिधींवर कायम काट मारली जायची. मात्र मागील दीड वर्षांत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री फडणविस यांनी कणकवली शहराच्या विकासाला सढळ हस्ते निधी दिला. कणकवली शहराचा आम्ही केलेला विकास , कणकवली शहराचा मागील 5 वर्षांत झालेला विकास शहरवासीयांनी लक्षात घ्यावा. नवीन डीपी रस्त्यांचे जाळे निर्माण करून शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी मजबूत केली आहे. बारमाही वाहणारा धबधबा, जानवली नदीवर गणपती साना येथे ब्रिजकम बंधारा, अद्ययावत क्रीडा संकुल कणकवलीत निर्माण होणार आहे.












