वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही उडणार धुरळा

बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नाधवडे यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत रविवार १४ जानेवारी रोजी कार्यक्रम होणार संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी): दरवर्षी प्रमाणे यंदाही बंड्या मांजरेकर मित्र मंडळ नाधवडे यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांना बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाही नाधवडे येथे धुरळा उडणार हे नक्की…! रविवार दि.१४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता महादेव माळ, नाधवडे येथे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत या स्पर्धां संपन्न होणार आहेत. या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार प्रमोद जठार, आमदार रवींद्र फाटक, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, नासीर काझी, डिवायएसपी किशोर सावंत, पोलिस निरीक्षक अतुल जाधव, अमित यादव, , फुलचंद मेंगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर नकाशे, उद्योजक राहुल सावंत, हनुमंत नारकर, दिगंबर इस्वलकर, सरपंच शैलजा पांचाळ व अन्य दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राज्यभरातून अनेक स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाममात्र १००० रूपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तर स्पर्धेसाठी उद्योजक हनुमंत नारकर यांचे कडून ३५ हजार रूपयांचे प्रथम पारितोषिक, उद्योजक दिगंबर इस्वलकर यांचे कडून २५ हजारांचे द्वितीय पारितोषिक, मनोज रावराणे यांचे कडून २० हजारांचे तृतीय पारितोषिक, बंड्या मांजरेकर मित्रमंडळ यांचे कडून १५ हजारांचे चतुर्थ पारितोषिक, याशीवाय अनुक्रमे १०,०००, ७०००, ५०००, ३०००,२००० रूपयांची रोख रक्कम व सर्व विजेत्यांना विनोद धुरी यांचे कडून आकर्षक चषक व ढाल प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी दया तानवडे ८७८८५४४५९४ व राजू शिंदे ७९७७५५६८२५ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नाधवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!